29 November 2020

News Flash

लविनाच्या आरोपांना महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर; ठोकला १ कोटींचा मानहानिचा दावा

‘माझ्या मृत्यूला महेश भट्ट जबाबदार असेल’; व्हिडीओ शेअर करत तिने केले गंभीर आरोप

महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं, असा खळबळजनक आरोप लविना लोध हिने केला आहे. लविना ही महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी आहे. तिच्या या आरोपांवर आता महेश भट्ट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी लविना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानिचा दावा ठोकला आहे.

अवश्य पाहा – “जातिनिहाय आरक्षण बंद करा”; कंगना रणौतची सरकारकडे मागणी

महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांनी लविनाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भट्ट कुटुंबियांना केवळ बदनाम करण्यासाठी लविनाने हे आरोप केले आहेत असा दावा महेश भट्ट यांनी केला आहे. शिवाय तिने आपले सर्व आरोप मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आमच्यासमोर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असाही इशारा महेश भट्ट यांनी दिला आहे. दरम्यान हे प्रकरण सध्या कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १६ नोव्हेंबरला होणार आहे.

अवश्य पाहा – “माफी माग अन्यथा मानहानिचा दावा ठोकेन”; महेश भट यांच्या सुनेला अमायराचा इशारा

काय म्हणाली होती लविना लोध?

“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”

पुढे ती म्हणते, “ही सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुमच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात. महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केलं आहे. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रास देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर मी त्यांच्याविरोधात एनसी करायला गेले तर कोणत्याच पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून घेतली जात नाही, आणि जर का ती घेतली तर कोणीही त्यावर काहीच कारवाई करत नाही. जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झालं तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील” असे आरोप लविनाने केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 8:00 pm

Web Title: mahesh bhatt move defamation suit against luviena lodh mppg 94
Next Stories
1 “एकमेकांना ओळखसुद्धा दाखवत नव्हतो”; हंसल मेहतांनी सांगितलं मनोज वाजपेयीशी ६ वर्षे न बोलण्यामागचं कारण
2 नंदिता वहिनी परत येतेय, एक नवा ट्विस्ट घेऊन!
3 पोलंडमधील रस्त्याला हरिवंशराय बच्चन यांचं नाव; फोटो पाहून बिग बी झाले भावूक
Just Now!
X