बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी रेडिओ शोमध्ये दारुचं व्यसन आणि व्यसनमुक्त होण्याच्या विषयांवर बेधडक वक्तव्य केले. त्यांनी या शोमध्ये सांगितले की, पूजा जेव्हा लहान होती तेव्हा ती फार लाजाळू होती. एक दिवसं दारु प्यायलानंतर मी तिला उचलून घेतले तेव्हा तिने माझ्याकडे पाहून तोंड वळवले. तो माझ्या आयुष्यातला दारू पिण्याचा शेवटचा दिवस होता.

संजय दत्तबद्दलही त्यांनी अनेक खुलासे केले. संजयही दारुच्या आहारी गेला होता. त्याच्या दिवसाची सुरूवात दारूने व्हायची. संजय दारुचा उपयोग माऊथवॉश म्हणून करायचा. एक वेळ अशी होती की संजय झोपून उठला की तो सर्वातआधी अमली पदार्थांचाच विचार करायचा. दारुपेक्षाही अमली पदार्थांपासून मुक्तता मिळवणं संजयसाठी खूप कठीण होतं. भट्ट यांनी या संपूर्ण घटनेचा खुलासा भट्ट नॅचरली या रेडिओवरील चॅटशोमध्ये केला. याबद्दल ट्विटही त्यांनी केले. पूजा भट्टनेही या शोमध्ये तिच्या दारुच्या व्यसनाविषयी सांगितले. पूजाचे यासंदर्भात एक पुस्तक लिहीण्याचा मानस आहे. दारुचे व्यसन सोडणं कठीण असलं तरी अशक्य नाही हेच तिला या पुस्तकाद्वारे जगाला सांगायचे आहे.

दरम्यान, संजय दत्तने नवीन वर्षाचे स्वागत दुबईमध्ये केले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी मान्यता मुलं इकरा, शाहरानही होते. या ट्रीपची खासियत म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत संजयची मोठी मुलगी त्रिशालाही होती. या संपूर्ण दत्त कुटुंबियांचा फोटो मान्यताने सोशल मीडियावर शेअर केला होता.