News Flash

प्रतिक्षा संपली! ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महेश मांजरेकर करणार सूत्रसंचालन

आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली. त्यानंतर हे पर्व संपत नाही तर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले होते. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘मराठी मुलगा भेटला नाही का लग्न करायला?’, यूजरचा प्रश्न पाहून सोनालीला आले हसू, म्हणाली…

तसेच अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’ असे म्हटले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ३’च्या यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमकं काय होणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. आता ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 11:52 am

Web Title: mahesh manjrekar bigg boss marathi 3 coming soon avb 95
Next Stories
1 International Yoga Day: कंगना रनौतचा अनोखा दावा, योगामुळे दोन महिन्यात ठणठणीत झाली आई
2 टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…
3 चाहत्यांच्या मागणीनंतर कपिल शर्माने शेअर केला मुलांसोबतचा फोटो
Just Now!
X