News Flash

Bigg Boss Marathi 2 : महेश मांजरेकरांचा ‘रॅपर लूक’ ठरतोय चर्चेचा विषय

'बिग बॉस मराठी २'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महेश मांजरेकर

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात कोणते कलाकार असणार याची चर्चा रंगत असतानाच या पर्वाचं सूत्रसंचालन करणारे अभिनेते महेश मांजरेकर यांचा ‘रॅपचीक रॅपर लूक’ आता चर्चेचा आला आहे. मांजरेकरांनी या रिअॅलिटी शोसाठी रॅप साँगही शूट केलंय जे त्यांनी स्वतः गायलं आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागाच्या प्रोमोसाठी महेश मांजरेकरांनी चार वेगवेगळ्या लूकमध्ये शूटींग केलं आहे. प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यातल्याच एका प्रोमोत मांजरेकरांचं रॅप साँग असेल. डॅपर लूक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप साँगमधली एण्ट्री एकदम कडक आहे. या गाण्याच्या चित्रिकरणासाठी सहा वेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले होते.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणार कोण?

‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना १४ मे रोजी बिग बॉसच्या घरात नेण्यात येणार आहे. त्यानंतर १७ मे रोजी शूटिंगला सुरुवात आहे आणि १९ मे रोजी ‘बिग बॉस मराठी २’चा पहिला एपिसोड प्रसारित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 5:52 pm

Web Title: mahesh manjrekar rap song for bigg boss marathi
Next Stories
1 Photo : ऋषी कपूर- नीतू कपूर यांच्या भेटीला दीपिका
2 Student Of The Year 2 : ‘ये दुख खत्म क्यूँ नहीं होता?’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
3 ‘बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीला या कारणामुळे आला होता काजोलचा राग
Just Now!
X