News Flash

‘मस्त चाललंय आमचं’ म्हणणाऱ्या सेलिब्रिटींना दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फटकारलं

फेसबुकवर पोस्ट लिहित कलाकारांची कानउघडणी केली.

महेश टिळेकर

लॉकडाउनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. घरी बसून काय काय करत आहोत, याचे अपडेट्स त्यांनी चाहत्यांना दिले. लाइव्ह गप्पांचं सेशन, व्यायामाचे धडे, खाण्या-पिण्याचे टिप्स असं सगळं काही सुरू आहे. मात्र याच सेलिब्रिटींना इंडस्ट्रीतील ज्येष्ठ व दिग्गज कलाकारांचा विसर पडल्याची टीका निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केली आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी या कलाकारांची कानउघडणी केली आहे.

‘मराठी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणारे अशोक सराफ यांच्या वाढदिवशी निदान दोन ओळी शेअर कराव्याशा आजच्या तरुण कलाकारांना वाटत नाही का? सुलोचना दीदींचा वाढदिवस होता, विजू खोटे गेले. पण काही बोटावर मोजण्या इतक्यांचा अपवाद सोडला तर अन्य कोणत्याही कलाकाराला त्यांच्यावर साधा एक शब्दही लिहावासा वाटला नाही. हिंदीतील मोठ्या हिरोचा वाढदिवस असेल तर गुगलवर फोटो शोधून तो स्वत:च्या अकाऊंटवर पोस्ट करून त्या हिरोबद्दल असलेला अभिमान आणि कौतुक दाखवणारी, स्वत:ला स्वयंघोषित मराठी स्टार म्हणणारी ही काही हुशार कलाकार मंडळी आपल्याच माणसाचे कौतुक करताना का कमी पडतात?’ असा सवाल त्यांनी केला.

सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणाऱ्या मराठी कलाकारांना इंडस्ट्रीतल्या जेष्ठ व दिग्गज कलावंतांविषयी काहीच लिहावंसं, बोलावंसं, शेअर करावंसं वाटत नाही का, असं म्हणत त्यांना खरपूस समाचार घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 3:21 pm

Web Title: mahesh tilekar lashed out on marathi celebrities ssv 92
Next Stories
1 आठ ऑस्कर जिंकणारा चित्रपट देतोय वर्णद्वेषाला प्रोत्साहन?; HBO ने उचलले ‘हे’ पाऊल
2 अभिनेत्री आर्थिक संकटात; मदतीच्या आवाहनसाठी रेणुका शहाणेंनी लिहिली पोस्ट
3 “अमित शाहांना धड खोटंही बोलता येत नाही”; ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करुन अभिनेत्याचा टोला
Just Now!
X