करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्राणघातक विषाणूला रोखण्यासाठी जवळपास प्रत्येक देशाने आंतराष्ट्रीय प्रवासाला बंदी घातली आहे. परिणामी अभिनेत्री माहिका शर्मा आता इंग्लंडमध्येच अडकली आहे. केवळ फळं खाऊन ती आपलं पोट भरत आहे.

माहिका कशी अडकली इंग्लंडमध्ये?

इंग्लंडमध्ये सध्या भारतापेक्षा भीषण परिस्थिती करोना विषाणूमुळे निर्माण झाली आहे. युकेमध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थीत माहिरा अडकली आहे. खरं तर माहिरा इंग्लंडमध्ये फिरण्यासाठी गेली होती. मात्र लॉकडाउनमुळे आता तिथेच थांबण्याची वेळ तिच्यावर आली आहे.

“मी फळं आणि ज्युस पिऊन आपलं पोट भरत आहे. करोनामुळे येथील लोकांचे जनजीवन पार विस्कळीत झालं आहे. इथे खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मी सेल्फ क्वारंटाइनमध्ये थांबली आहे. मात्र इथे मला कैद झाल्यासारखे वाटत आहे.” असा अनुभव माहिराने स्पॉटलाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

माहिरा शर्मा एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने यापूर्वी ‘एफ आय आर’, ‘नागिन’, ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत. बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. तिचे सोशल मीडियावरील पोस्ट देखील प्रचंड चर्चेत असतात.