येत्या रविवारी म्हणजेच १३ डिसेंबर रोजी झी मराठी प्रेक्षकांसाठी माझा होशील ना, कारभारी लयभारी आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे एक तासाचे विशेष भाग सादर करणार आहे. माझा होशील ना या मालिकेत सई आणि आदित्यचं एकमेकांशी पॅचअप होणार का हे कळेल आणि सर्वात मोठा क्षण म्हणजे आदित्यला मेघनाशी लग्न ठरवण्यासाठी दापोलीला जायची आज्ञा मिळणार आहे.

कारभारी लयभारी मालिकेत आत्तापर्यंतच्या भागांत पियूने राजवीरपासून तिची खरी ओळख लपवली होती. तिने स्वत:च्या पोस्टरवर शेण फासल्याप्रकरणी निष्कारण राजवीर त्यात अडकतो. राजवीरला आपल्यामुळे त्रास झाला या भावनेने अस्वस्थ पियूने अनेकदा त्याला खरं सांगण्याचा प्रयत्न केला. पण दरवेळी काही ना काही अडचणी येत आहेत. दुसरीकडे अंकुशरावने आता पियूला राजकारणात आणण्याची तयारी सुरु केलीये. तिची सर्वांना ओळख करुन देण्यासाठी तो एका कार्यक्रमाचं आयोजन करतो. याच कार्यक्रमावेळी राजवीरला प्रियांकाची खरी ओळख कळणार आहे. महाएपिसोडमध्ये हा जबरदस्त ड्रामा घडणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत इतक्या घडामोडींनंतर शनायाच्या आयुष्यात कोणाच्या रूपात प्रेम परत येईल हे कळेल. मनोरंजनाची ही धमाल येत्या रविवारी १३ डिसेंबरला ‘माझा होशील ना’ संध्याकाळी ७ वाजता, ‘कारभारी लयभारी’ रात्री ८ वाजता आणि माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.