03 March 2021

News Flash

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या जागी येणार ‘ही’ मालिका

जाणून घ्या, या मालिकेचं नाव

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आज छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

एखादी मालिका संपुष्टात यायला लागली की तिची जागा नवी मालिका घेते. त्यामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपल्यानंतर तिच्या जागी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून दोन नव्या चेहऱ्याची आपल्याला ओळख होणार आहे.

वाचा : ‘ही’ चिमुकली आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपल्यानंतर त्याच वेळात ‘माझा होशील ना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक कथानकावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेमध्ये गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण असून विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

वाचा : मृणाल कुलकर्णीच्या लेकाचं कलाविश्वात पदार्पण; ‘या’ मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका

या मालिकेत त्याच्यासोबत सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी अशी दिग्गज कलाकारमंडळी स्क्रीन शेअर करणार आहे. ही मालिता येत्या २ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 9:39 am

Web Title: majha hoshil na this new tv show replace swarajya rakshak sambhaji serial ssj 93
Next Stories
1 ‘ही’ चिमुकली आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी
2 जिव्हारी लागणारी थप्पड
3 Video : वरुण धवनच्या गाडीखाली आला फोटोग्राफरचा पाय अन्…
Just Now!
X