News Flash

गोव्यात अमृता अरोराच्या बंगल्यात मलायका आणि अर्जुन कपूर राहतायत एकत्र

अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचं नातं मीडियापासून लपवलं होतं. पण आता....

अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा प्रियकर अर्जुन कपूर सध्या गोव्यामध्ये नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आजरा बीचजवळील आलिशान बंगल्यामध्ये त्यांचा मुक्काम आहे. मलायकाची बहिण अमृता अरोरा आणि तिचा नवरा शकील लडाकचा हा बंगला आहे. अर्जुन कपूरने सोमवारी गोव्यातील या बंगल्यामध्ये काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

“शकील लडाक आणि अमृता अरोरा तुम्ही खूपच सुंदर घर बांधले आहे. गोव्यात यापेक्षा चांगले हॉलिडे होम असू शकत नाही” असे कॅप्शन अर्जुनने या फोटोला दिले आहे. अर्जुनच्या या पोस्टवर मलायका आणि अमृता दोघींनी हार्टचा इमोजी टाकला आहे. मुंबईत कुटुंबासोबत नाताळ साजरा केल्यानंतर मलायका आणि अमृता दोघी गोव्याला गेल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचं नातं मीडियापासून लपवलं होतं. पण आता दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसतात. सोशल मीडियावर परस्परासोबतचे फोटो शेअर करतात आणि त्यावर कमेंटही करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 2:55 pm

Web Title: malaika arora and arjun kapoor staying at amrita aroras goa home dmp 82
Next Stories
1 अक्षय कुमारने पुन्हा वाढवलं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क!
2 खऱ्या आयुष्यातदेखील हत्तीसारखं खाता का?; ‘तारक मेहता’मधील ‘डॉ. हाथी’ म्हणाले…
3 २०२० या वर्षात सकारात्मक राहण्यासाठी काय केलं?, दिलजीतने सांगितला त्याचा ‘हॅपिनेस फंडा’