News Flash

अर्जुनसोबतच्या नात्यावर अखेर मलायका बोलली..

अरबाज खान आणि मलायकाच्या नात्यात आलेल्या दुराव्याला अर्जुनच जबाबदार?

अर्जुन कपूर, मलायका अरोरा

यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार जोडप्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड वर्तुळामध्ये कोणत्या कलाकाराचे नाव कोणासोबत आणि कधी जोडले जाईल याचा काही नेम नाही. सध्या बी टाऊनमध्ये अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यामध्ये असलेल्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान आणि मलायकाच्या नात्यात आलेल्या दुराव्याला अर्जुनच जबाबदार आहे अशाही चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. या सर्व चर्चांचे वादळ शमवत मलायकाने एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामागचे सत्य उघ केले आहे.

वाचा: बहिण अर्पिताचा अपमान सलमान अजून विसरला नाही

काही दिवसांपूर्वी अर्जुनला मलायकाच्या घराबाहेरही पाहिले गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन अनेकदा बऱ्याच वेळासाठी मलायकाच्या घरी येत असतो. मलायका आणि अरबाज खानने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून ती आणि तिचा मुलगा ‘टस्कनी हाईट्स’ येथे राहात आहेत. याआधीही मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरविषयीच्या विविध चर्चा रंगत होत्या. पण, त्याविषयी मलायका आणि अर्जुनने मात्र शांत राहत कोणत्याही प्रकारचे वक्तव्य न करण्यालाच प्राधान्य दिले होते.

‘डीएनए’च्या वृत्तानुसार मलायकाने सरतेशेवटी तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामागचे सत्य उघड केले आहे. ‘अर्जुन माझा खुपच चांगला मित्र आहे. पण, लोकांनीच याचा वेगळा अर्थ काढला आहे जो चुकीचा आहे’ असे मलायका म्हणाली. त्यामुळे आता मलायका-अर्जुनच्या नात्याचे चित्र मलायकाने काहीसे स्पष्ट केल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेला काही काळ अरबाज आणि मलायकाच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर आता पुन्हा हे दोघंही त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मुलांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण तसे काहीही झालेले नाही. या दोघांनीही याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तुर्तास सध्या चित्रपट आणि विविध प्रोजेक्ट्समध्ये हे दोन्ही कलाकार सध्या व्यग्र आहेत. अर्जुनने नुकताच त्याच्या आगामी ‘मुबारकां’ या चित्रपटातील फर्स्ट लूकही इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 11:48 am

Web Title: malaika arora breaks silence on her relationship with arjun kapoor
Next Stories
1 नऊ वर्षांनंतर सलमान त्याच्या ऑनस्क्रिन मुलाला भेटतो तेव्हा..
2 VIDEO: वाणी-रणवीर करत आहेत ‘खुलके-डुलके प्यार’
3 एक सितार, चार तबले, चार ताल आणि चार राग
Just Now!
X