News Flash

प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू

मनोरंजनसृष्टीला आणखी एक झटका; प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सबरी नाथ यांचा मृत्यू झाला आहे. ते ४३ वर्षांचे होते. मित्रमंडळींसोबत बॅडमिंटन खेळत असताना अचानक त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना त्रिवेंद्रम येथील रुग्णालयात भरती केलं. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. सबरी नाथ यांच्या मृत्यूमुळे दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीला जबरदस्त धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सबरी नाथ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता होते. मिन्नूकेट्टू या मल्याळम मालिकेतून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेमुळे त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्यानंतर सबरीनाथ अमाला, स्वामी अयप्पन आणि श्रीपदम यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली. सध्या ते पॅनकिली या मालिकेत काम करत होते. अभिनयासोबतच ते एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू देखील होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 1:40 pm

Web Title: malayalam tv actor sabari nath dies due to cardiac arrest mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणार करण पटेल?
2 कंगनानं खरंच शिवसेनेला मतदान केलं का, नेमकं सत्य काय?
3 फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X