नुकताच प्रदर्शित झालेला “मनातल्या उन्हात” हा चित्रपट मराठी प्रेक्षकांवर मोहिनी घालत असतानाच आता ह्या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची पहिली सिनेनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची अमेरिकेतील “फेस्टिवल ऑफ ग्लोब” या नामांकित चित्रपट महोत्सवात निवड करण्यात आली आहे . ह्या महोत्सवासाठी अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, चीन, इराण यांसारख्या वेगवेगळ्या देशातील सुमारे ३००० चित्रपट स्पर्धेमध्ये होते. ७ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये हा सोहळा केलिफोर्निया येथे रंगणार असून या महोत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चेन, अभिनेत्री शेरान स्टोन, मार्टिन शीन यांच्यासह हॉलीवूडच्या अनेक दिग्ग्दज अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे. आपल्या मातीत बनलेल्या या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेतल्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद झाल्याचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2015 रोजी प्रकाशित
“मनातल्या उन्हात” चित्रपटाची”फेस्टिवल ऑफ ग्लोब”मध्ये निवड!!
नुकताच प्रदर्शित झालेला "मनातल्या उन्हात" हा चित्रपट मराठी प्रेक्षकांवर मोहिनी घालत असतानाच आता ह्या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर

First published on: 04-08-2015 at 01:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manatlya unhat selected for festival of globe