१९५१ साली भगवान दादा यांच्या ‘अलबेला’ चित्रपटातील ‘शोला जो भडके’ या गाण्याने लोकांवर मोहिनी घातली होती. आज ६५ वर्षांनी या गाण्याची जादू रसिकांना पुन्हा अनुभवता आली. भगवान दादांचे रुपेरी आयुष्य पडद्यावर पुन्हा जिवंत करणारा ‘एक अलबेला’ हा शेखर सरतांडेल दिग्दर्शित चित्रपट सध्या प्रत्येकाच्या तोंडी चर्चेचा विषय ठरला आहे. या मराठमोळ्या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन गीता बाली यांच्या भूमिकेत तेही मराठी चित्रपटात दिसणार आहे. विद्याबरोबर मंगेश देसाई याने भगवानदादा म्हणून चित्रपटात रंग भरले आहेत. या दोघांनीही ‘शोला जो भडके’ या गाण्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या गाण्यावर ठेका धरला. हा चित्रपट मराठीत एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 5, 2016 1:25 am