News Flash

‘मी सुद्धा राजपूत! एकालाही सोडणार नाही’; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर

करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप कंगनानं केला आहे.

पुढील आठवड्यात प्रदर्शित होणारा कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या चित्रपटावरून करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप कंगनानं केला आहे. जर करणी सेनेनं मला धमक्या देणं थांबवलं नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावं अशा इशारा कंगनानं दिला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसेवेच्या माहितीनुसार करणी सेनेच्या महाराष्ट्र विभागानं या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवलं आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली असतील तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असंही या पत्रात म्हटलं होतं.

या संपूर्ण प्रकरणावर कंगनानं निषेध नोंदवला आहे. ‘मणिकर्णिकाच्या प्रदर्शनावरून मला करणीसेनेकडून धमक्या येत आहेत. करणी सेनेनं असंच सुरू ठेवलं तर मात्र मी एकालाही सोडणार नाही मी देखील एक राजपूत आहे’ अशा तीव्र शब्दात कंगनानं पिंक व्हिलाला दिलेल्या मुलाखतीत करणी सेनेला जशास तसे उत्तर दिलं आहे. ‘चार इतिहासकारांसह सेन्सॉर बोर्डानंही चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे असं असताना करणी सेनेच्या आक्षेपाचं कारण काय?’ असा रोखठोक सवालही तिनं केला आहे.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट  २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यापूर्वी करणी सेनेनं संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 1:22 pm

Web Title: manikarnika controversy i will destroy each of them kangana ranaut to karni sena
Next Stories
1 त्या चर्चा निव्वळ अफवा; ‘सूर्यवंशी’बद्दल रोहित शेट्टीचा नवा खुलासा
2 Photo : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार ‘ही’ सौंदर्यवती
3 ‘अंदाज अपना अपना’मध्ये ही बॉलिवूड जोडी अमर-प्रेमच्या भूमिकेत?
Just Now!
X