News Flash

भन्साळींचा चित्रपट नाकारल्याचा टेलिव्हिजन अभिनेत्रीला पश्चात्ताप

तो माझा वेडेपणाच होता.

अंकिता लोखंडे

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनात आणि त्यांच्या घराघरात स्थान मिळवणारी एक अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ‘अर्चना’ ही भूमिका साकारत अंकिताने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. गेल्या काही काळापासून ती बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. येत्या काळात अंकिता ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. पण, मुळात याधीसुद्धा तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, जी नाकारल्याचा पश्चात्ताप अंकिताला आजही होत आहे.

अंकिताला आपल्या चित्रपटाची ऑफर देणारी ती व्यक्ती म्हणजे, संजय लीला भन्साळी. ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपट साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा असतानाही अंकिताने तो नाकारला होता. तिने नेमकं असं का केलं, याचाच खुलासा ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत तिने केला. ‘अर्थात मला त्यांची ऑफर नाकारण्याचा पश्चात्ताप होत आहे. तो माझा वेडेपणाच होता. मी त्यांना किंवा त्या चित्रपटाला नाही नाकारलं. मला खरंच त्या चित्रपटात काम करायचं होतं, पण मी त्यांच्या अपेक्षा आणि ती भूमिका नीट बजावू शकेन का याबद्दलच साशंक होते. बऱ्याच वेळी तुम्हाला कामाकडे मोठ्या जबाबदारीनं पाहावं लागतं. मला खरंच नाही वाटत की मी मोठी संधी गमावली आहे. कारण, सरतेशेवटी ते संजय लीला भन्साळी आहे.. (मिश्किलपणे हसून)’, असं अंकिता म्हणाली. आपल्याला यापुढे त्यांनी एखाद्या चित्रपटाची ऑफर दिली, तर ती निर्विवादपणे आपण स्वीकारू, हेच जणू तिचं हे हास्य सांगून गेलं. मुख्य म्हणजे भन्साळींनी आतापर्यंत अंकिताला दोनदा चित्रपटाची ऑफर देऊनही तिला या संधीचं सोनं करता आलेलं नाही.

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

तेव्हा आता भन्साळी अंकिताला त्यांच्या कोणत्या आगामी चित्रपटात संधी देतात का आणि जर तिला ही संधी मिळाली तर ती त्याचं सोनं करते का, हे पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सध्यातरी अंकिता ‘मणिकर्णिका…’वरच लक्ष देत असून, या चित्रपटाकडून तिला बऱ्याच अपेक्षा आहेत. कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून ती ‘झलकारीबाई’ हे पात्र साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच अंकिताच्या या लूकला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 12:35 pm

Web Title: manikarnika movie television bollywood actress ankita lokhande regrets not doing sanjay leela bhansalis film
Next Stories
1 अखेर ‘या’ हॉलिवूड सिनेमाच्या रिमेकसाठी अभिनेत्री सापडली
2 ‘या’ अभिनेत्याने नाकारलेल्या ‘बँड बाजा बारात’मुळे रणवीरला मिळाली नवी ओळख
3 तुझी प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी मी शांत राहिलो; सुनीलचा कपिलवर पलटवार
Just Now!
X