News Flash

छोट्या पडद्यावरील आणखी एक जोडी होणार विभक्त ; मानिनी डे- मिहिर मिश्रा घेणार घटस्फोट?

१६ वर्ष संसार केल्यानंतर मानिनी- मिहिर विभक्त होणार ?

कलाविश्वात अनेक वेळा सेलिब्रिटींच्या अफेअर, ब्रेकअप आणि घटस्फोट यांच्या चर्चा रंगत असतात. काही काळापूर्वी लोकप्रिय जोडी जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. त्यानंतर छोट्या पडद्यावरील आणखी एक जोडी घटस्फोटाच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्री मानिनी डे आणि मिहिर मिश्रा ही जोडी १६ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘सीआयडी’ अशा लोकप्रिय मालिकांमधून मानिनी डे घराघरात पोहोचली होती. मानिनीने २००४ साली अभिनेता मिहिर मिश्रा याच्यासोबत लग्न केलं होतं. जवळपास १६ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर नात्यात चढउतार आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत मानिनीने त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलं होतं. त्यावेळी हा निर्णय का घेतला हे तिने सांगितलं आहे.

“जसं एखाद्या नात्यात चढउतार येत असतात, तसंच वैवाहिक आयुष्यातही होत असतं. प्रत्येक नात्यात रुसवे-फुगवे असतातच. दोन भिन्न संस्कृतीत, घरात लहानाचे मोठे झालेल्या व्यक्तींच्या जीवनात असाही एक क्षण येतो जेव्हा त्यांना विभक्त व्हावं लागतं”, असं मानिनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “माझ्यासाठी लग्न हे एक पवित्र बंधन आहे, त्यामुळे मी कायम त्याच्या मर्यादांचं पालन करेन. जवळपास १५-१६ वर्ष आम्ही दोघं एकत्र राहिलो, जीवनात अनेक चढ-उतार आले. मात्र आमचं नात्यामुळे आम्ही एकत्र राहिलो. मिहिरच्या पुढील वाटचालीसाठी त्याला मनापासून शुभेच्छा देते”.

दरम्यान, सध्या मिहिर आणि मानिनी हे विभक्त राहत आहेत, मानिनी मुंबईत तिच्या मुलीसोबत राहत आहे, तर मिहिर पुण्यात त्याच्या आई-वडिलांसोबत राहतोय. गेल्या सहा महिन्यांपासून ते वेगळे राहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 11:00 am

Web Title: maninee de mihir mishra16 years marriage on rough patches stays separately ssj 93
Next Stories
1 “होय, आपण त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बांधिल आहोत कारण…”; मनोज वाजपेयीने बॉलिवूडला सुनावलं
2 प्रसाद ओक सांगतोय लॉकडाउनमध्ये उपयुक्त असा सुखी संसाराचा मूलमंत्र
3 लोकप्रियतेत दीपिका आघाडीवर; इन्स्टाग्रामवर झाले ५ कोटी फॉलोअर्स
Just Now!
X