13 August 2020

News Flash

सोशल मीडियावर मनोज बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ची चर्चा

एक सामान्य माणूस होतो वर्ल्ड क्लास गुप्तहेर

जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड सिनेसृष्टीत आपली एक वेगळीच छाप पाडणारा अभिनेता मनोज बाजपेयी आता वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या वेब सिरीजचे नाव ‘द फॅमिली मॅन’ असे आहे. ही सिरीज अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर २० सप्‍टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारी नामक एका मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही नवी मालिका आहे. या मालिकेत मनोज बाजपेयी बरोबरच प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी हे कलाकार देखील दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 6:59 pm

Web Title: manoj bajpai the family man mppg 94
Next Stories
1 ”..तर त्यांनीच माझ्याकडे यावं”, हॉलिवूड पदार्पणाबाबत नवाजुद्दीनचं विधान
2 शेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन
3 माझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X