16 January 2021

News Flash

‘द फॅमिली मॅन २’चा टीझर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. भारत पाकिस्तान युद्द, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजच्या पहिल्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजच्या एक मिनिट सहा सेकंदाच्या टीझरमध्ये श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या लाइफमध्ये समस्या असल्याचे पाहायला मिळते. तसेच सर्वजण तो गायब असल्याचे बोलताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी मनोज वाजपेयीची झलक पाहायला मिळते. टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

आणखी वाचा- ‘तिचा भूतकाळच तिचे भविष्य वाचवू शकतो’, परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’चा टीझर प्रदर्शित

‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 3:47 pm

Web Title: manoj bajpayee starrer the family man season 2 teaser released avb 95
Next Stories
1 ‘तिचा भूतकाळच तिचे भविष्य वाचवू शकतो’, परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’चा टीझर प्रदर्शित
2 बिकिनी न घातल्यामुळे करिअला लागली उतरती कळा; अभिनेत्रीनं सांगितली आपबिती
3 “मला तिथे गुदमरल्यासारखं वाटतं”; जेव्हा इम्रान खानने केलं होतं बॉलिवूड पार्ट्यांबद्दल वक्तव्य
Just Now!
X