“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं खळबळजनक वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली असंही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर संगीतकार मनोज मुंतशिर याने प्रतिक्रिया दिली आहे.

अवश्य वाचा – आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य

“शर्माजी नक्कीच वाल्मिकींसोबत खेळले असणार म्हणून त्यांना ही प्राथमिक माहिती मिळाली. असो, यामुळे त्यांचा देश किमान चर्चेत तरी आला. प्रभू राम यांच्या नावामुळे आजवर अनेकांचं भलं झालं आहे. आता हे देखील खूश आहेत.” अशा आशयाचे ट्विट करुन मनोज मुंतशिर याने नेपाळच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य वाचा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

हे प्रकरण नेमकं आहे काय?

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे गेल्या काही काळात सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटं आहे. कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.