News Flash

सिद्धार्थ-रितेशच्या ‘मर जावा’चं पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाचं पोस्टर सिद्धर्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

सिद्धार्थ-रितेशच्या ‘मर जावा’चं पोस्टर प्रदर्शित
मर जावां

‘एक व्हिलन’ या चित्रपटात एकत्र झळकेली सिद्धार्थ मल्होत्रा-रितेश देशमुख जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या आगामी ‘मर जावां’ या चित्रपटात ही जोडी स्क्रिन शेअर करणार असून बुधवारी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

निखिल अडवाणी निर्मित या चित्रपटाचं पोस्टर सिद्धर्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये ‘इश्क में मरेंगे भी और मारेंगे भी.’अशा टॅगलाईन देण्यात आल्या आहेत. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये काळ्या रंगाची शेड देण्यात आली असून काही भंगलेल्या मुर्त्यांचे अवशेष दाखविण्यात आले आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचं कथानक प्रेमकथेवर आधारित असून हा चित्रपट पुढील वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ-रितेशसोबत अभिनेत्री तारा सुतारियादेखील स्क्रिन शेअर करणार आहे. तारा सध्या तिच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या सीक्वलमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2018 7:33 pm

Web Title: mar jaavaan poster sidharth malhotra and riteish deshmukh together comeback with film mar jaavaan
Next Stories
1 २८ वर्षानंतर कपूर कुटुंबातील ‘या’ अभिनेत्याचं पुनरागमन
2 Video : बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या ‘कृतांत’चा टीझर प्रदर्शित
3 सोनालीची तब्बेत सुधारतेय, मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतली भेट
Just Now!
X