04 August 2020

News Flash

अशोक सराफ ,पद्मिनी कोल्हापुरेंचा ‘प्रवास’ आता ओटीटीवर

या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांनी चित्रपट, मालिका, वेबसीरिज पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपट, मालिकांची मेजवानी मिळत आहे. यातच आता अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा प्रवास हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘प्रवास’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळेच हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी केला आहे.

सरळमार्गी आयुष्य जगणारे इनामदार (अशोक सराफ) वयाच्या एका टप्प्यावर एक निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयाचा सहाजिकच त्यांच्या कुटुंबावरही परिणाम होतो आणि संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे.
दरम्यान, या चित्रपटात अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर हे कलाकारही झळकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 2:53 pm

Web Title: marathi actor ashok saraf and padmini kolhapure movie pravas release on digital platform ssj 93
Next Stories
1 सुशांतचं इन्स्टाग्राम सुरुच राहणार; ही व्यक्ती चालवणार सोशल वारसा
2 दिग्गज कलाकारांचा आदर न करणाऱ्या हिरोंवर संतापल्या पूजा पवार; शशांक केतकरची दिलगिरी
3 तैमुरच्या बातम्यांपेक्षा सुशांतबद्दलची माहिती द्या!; टीम इंडियाचा खेळाडू संतापला…
Just Now!
X