कलाकार असण्याआधी आपण एका देशाचे सुजाण नागरिक आहोत याची जाण ठेवत ‘लागीरं झालं जी’ फेम निखिल चव्हाणने आपल्या रसिक जनतेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोलाचा सल्ला दिला आहे. ‘लागीरं झालं जी’ या मालिकेमध्ये निखिलने फौजीची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारत असताना त्याला लष्कराचं महत्व खऱ्या अर्थाने समजलं. त्यातच वीरगती या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याला देशाला आणि सैन्याला भेडसावणाऱ्या संकटांना सामोरं जातानाच्या वेदना जाणून घेता आल्या. त्यामुळे सध्या चाललेल्या निवडणुकीच्या धामधुमीत त्याने मतदारांना एक खास सल्ला दिला आहे.

निखिलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना योग्य उमेदवाराची निवड करा असा सल्ला दिला आहे. ‘विचार करून प्रतिनिधी निवडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा’ असं निखिलने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”

सध्या आपल्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध असतात अगदी सगळ्याच गोष्टींत केवळ मनोरंजनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहा ना… चित्रपट, मालिका, गाणी, इंटरनेट सर्फिंग… २४ तास सारं काही तुमच्या मनोरंजनासाठी तत्पर. बरं चॅनेल्स ते ही असंख्य. एक झालं की दुसरं.. अगदी मिनिटा-मिनिटाला तुम्ही चॅनल्स बदलू शकता. का बदलता कारण तुम्हाला बदल हवा असतो. तुमच्याकडे निवडीचे पर्याय उपलब्ध असतात. इतक्या साध्य गोष्टींत तुम्हाला बदल हवाच असतो शिवाय तुम्ही पर्यायही विचारपूर्वक निवडत असताना देशात दर ५ वर्षांनी घडणारा बदल तुमच्या नजरेतून कसा सुटतो? भारत लोकशाहीप्रधान देश आहे. घटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला असून या देशाचे भवितव्य कणखर हातांत सोपवण्यासाठी आपण मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे. जेणेकरून सत्ता एककेंद्री न राहता चांगल्या कर्तृत्वान नेतृत्त्व असणाऱ्यांच्या हाती सत्ता जाईल व देशाचं विकास होईल. असा संदेश देणारा निखिलचा व्हिडिओ हलका-फुलका पण मार्मिक संदेश देतो.

कलाकारांचे फॅनफॉलोईंग प्रचंड असते. या फॅन्सच्या प्रेमाचा योग्य उपयोग कसा करायचा हे प्रत्येकालाच कळतं असं नाही. निखिलने किमान आपल्या प्रेक्षवर्गात ‘मतदान बजावा’ हा संदेश देत जनजागृती केली आहे जे वाखाणण्याजोगं आहे. निखिल नेहमीच देशसेवेला प्राधान्य देत आलेला आहे. देशाप्रती असणारा अभिमान त्याच्या प्रत्येक कृतीतून नेहमीच झळकतो शिवाय आपल्या मनातील भावना तो नेहमीच सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांत दिसतो. तेव्हा तुम्हीही विचार करा… मतदानाचा हक्क नक्की बजावा.