News Flash

‘आम्ही दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो पण..’; सिद्धार्थने सांगितली लग्नापूर्वीची गोष्ट

सिद्धार्थने मिताली मयेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि प्रमाणिक कलाकार म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरकडे पाहिलं जातं. चेहऱ्यावरील हसू आणि कामातील प्रमाणिकपणा यांच्या जोरावर आज त्याचे असंख्य चाहते आहेत. अलिकडेच सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत आहे. सिद्धार्थने लग्नापूर्वी ‘दिल के करीब’ या सुलेखा तळवलकरांच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने लग्नाविषयी आणि एकंदरीतच पर्सनल आणि प्रोफशनल लाइफविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याची ही मुलाखत सध्या चर्चेत येत आहे.

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थची ही मुलाखत चर्चेत येत असून सुलेखा तळवलकर यांनी सिद्धार्थला त्याच्या लग्नाविषयी काही प्रश्न विचारले. त्याचं उत्तर देताना त्याने आम्ही लिव्ह इनमध्ये होतो, पण लग्न होणार या विचाराने थोडं गडबडल्यासारखं होतंय, असं उत्तर दिलं.


“मला ना खूप धडधड होतेय. म्हणजे आता झालं बॅचलर लाइफ संपली. बॅचरल लाइफचे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता एक व्यक्ती लग्न करुन त्या घरी राहणारा आहे हे फिलिंग थोडं विचित्र आहे. म्हणजे यापूर्वी आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. दोन वर्ष आम्ही लिव्ह इनमध्ये होतो. खरं तर फरक फार काही पडणार नाहीये. फार तर फक्त घराचे पडदे बदलतील. बाकी काहीच फरक पडणार नाही. पण, ती फिलिंग आहे ना ती फार विचित्र आहे”, असं सिद्धार्थ म्हणाला.

पाहा : सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

 पुढे तो म्हणतो, “लिव्ह इनमध्ये राहतोय आणि आता थेट नवरा-बायको होणार. यात जबाबदारी येते, नाती जुळतात, दोन कुटुंब एकत्र येतात. या जड शब्दांचंच खरं टेन्शन येतं. पण, आहे ही सगळी मज्जा सुद्धा आहे. आम्ही मिळून छान धम्माल करु.”

पाहा : PHOTOS: मिताली-सिद्धार्थच्या लग्नातील न पाहिलेले खास फोटो

दरम्यान, सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून त्याला ६० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊसदेखील त्यावर पडत आहे. सिद्धार्थ-मितालीने २४ जानेवारी रोजी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपेवाडा येथे धुमधडाक्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 8:48 am

Web Title: marathi actor siddharth chandekar open up about his live in relation life with mitali mayekar ssj 93
Next Stories
1 रिहानासंबंधीत केलेले कंगनाचे जुने ट्वीट चर्चेत
2 रिहानाच्या ट्वीटनंतर अक्षय कुमार, करण जोहर म्हणतात…
3 अभिनेत्री ऋता दुर्गुळेने खरेदी केला नवा फ्लॅट
Just Now!
X