विनोदाचं अचूक टाइमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव हे नाव प्रेक्षकांसाठी नवीन नाही. केवळ मराठी चित्रपटसृष्टीचं नव्हे तर या अभिनेत्याने बॉलिवूडलादेखील वेड लावलं आहे. त्यामुळे सिद्धार्थ जाधव हे नाव आता हिंदी कलाविश्वातही गाजत असल्याचं दिसून येतं. आज सिद्धार्थचा वाढदिवस. त्यामुळे चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देत आहेत. यामध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सिद्धार्थला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सिध्दू Power pack energy.. थांब म्हटलं तरी न थांबणारा धबधबा.. मैत्रीचा सन्मान करणारा.. जीवाला जीव देणारा.. star तरी आकाशात न राहाता जमिनीवर असणारा.. आमच्या तिघांच्या पाठीमागे सावलीसारखा वावरणारा…वाढदिवस शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, अशी पोस्ट शेअर करत केदार शिंदे यांनी सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सिद्धार्थ जाधवने केदार शिंदे यांच्या ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’ अशा काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे या दोघांमधील मैत्री अनेकांना चांगलीच ठावूक आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..