21 April 2019

News Flash

…म्हणून स्वप्नील म्हणतो, ‘मी पण सचिन’

हा चित्रपट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे

स्वप्नील जोशी

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीची क्रेझ तरुणींमध्ये पाहायला मिळते. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट आणि ‘एका लग्नाची गोष्ट’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या स्वप्नीलने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची मोहम उमटवली आहे. या चित्रपटांनंतर त्याच्या पदरात आणखी एक चित्रपट पडला असून त्याने ट्विटरवर या आगामी चित्रपटाचं पोस्ट शेअर केलं आहे.

स्वप्नीलने आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्याच्या आगामी ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचं पहिलंवहिलं पोस्टर शेअर केलं आहे.  या चित्रपटात स्वप्नील प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु स्वप्नीलने त्याच्या भूमिकेविषयी कोणताही खुलासा केलेला नाही.

दरम्यान, ‘मी पण सचिन’ हा चित्रपट पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार असून श्रेयस जाधवने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. तर गणराज असोसिएट्स या चित्रपटाचे सादरकर्ते असणार आहेत.

First Published on November 8, 2018 12:43 pm

Web Title: marathi actor swapnil joshi share new movie poster me pan sachin