News Flash

‘हा’ मराठमोळा अभिनेता अडकणार दुसऱ्यांदा लग्नबंधनात

पहिली पत्नी 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारते..

‘मी अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता विजय आंदळकर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. तो अभिनेत्री रुपाली झंकारशी लग्न करणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे.

रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने, ‘पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम, नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन, शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये… सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ROOP (@rupalizankar)

आणखी वाचा : भावाच्या हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक

 

View this post on Instagram

 

A post shared by ROOP (@rupalizankar)

विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पुजा पुरंदरेशी झाले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेताला. पूजा सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by POOJA PURANDARE (@iam_poojapurandare)

विजयने ‘मी अँड मिसेस सदाचारी’, ‘ढोल ताशे’, ‘702 दिक्षित’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर रुपालीने ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केले आहे. ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 11:28 am

Web Title: marathi actor vijay andalkar engaged with rupali zankar avb 95
Next Stories
1 कंगनाने शाहरुखसोबत केली स्वत: ची तुलना, म्हणाली दोघांमध्ये आहे एवढाच फरक
2 “माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी माझं आयुष्य दयनीय केलं”, कंगनाने केला खुलासा
3 कंगना रणौतने थेट अमेरिकेवर साधला निशाणा, “लाज वाटते…मराहामारीच्या काळात तुम्ही..”
Just Now!
X