News Flash

विनीत भोंडेने खरेदी केली कार; पाहा फोटो

विनीतने हटके अंदाजात त्याच्या कारचं स्वागत केलं आहे

‘चला हवा येऊ द्या’, ‘बिग बॉस’ मराठी अशा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विनीत भोंडेने नुकतीच चारचाकी गाडी खरेदी केली आहे. विनीतने या गाडीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे हे फोटो शेअर करत त्याने एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष त्याच्या पोस्टकडे वेधल्याचं दिसून येत आहे.

“कारमुळे आयुष्य बदलत नसतं. पण जगण्याचा दृष्टीकोन नक्कीच उंचावतो”, असं कॅप्शन विनीतने या पोस्टला दिलं आहे. विनीतने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याची पत्नी सोनम पवारदेखील दिसून येत आहे.

दरम्यान, विनीत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक कार्यक्रमात काम केलं आहे. विनीत ‘चला हवा येऊ द्या’, ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात तर ‘शहाणपण देगा देवा’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ या चित्रपटांमध्ये झळकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 5:03 pm

Web Title: marathi actor vineet bonde bought new car ssj 93
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणी चौकशीतील प्रत्येक मिनिटाची अपडेट बाहेर कशी येते? काँग्रेस नेत्याचा सवाल
2 ‘Crime Patrol’मुळे बदललं ‘या’ सात अभिनेत्रींचं नशीब
3 ‘माल है क्या’ चॅटवर दीपिकानं केला खुलासा, अडचणींमध्ये होणार वाढ?
Just Now!
X