News Flash

वाहिनीसाहेबांच्या घरी युवराजांचे आगमन; धनश्री काडगांवकरला पुत्ररत्न

पोस्ट शेअर करत धनश्रीने दिली गुडन्यूज

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर आई झाली आहे. धनश्रीने एका गोंडस बाळा जन्म दिला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धनश्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. सोबतच बाळ आणि माझी प्रकृती स्वस्थ असल्याचंदेखील तिने सांगितलं आहे.

अभिनेत्री धनश्री काडगांवकरला मुलगा झाला असून रात्री उशीरा पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. तसंच ‘New life…New chapter’ असं कॅप्शन तिने ही पोस्ट शेअर करताना दिलं आहे.


“ही गोड बातमी तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद होतोय. पहाटे आमच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. माझी आणि बाळाची दोघंचीही प्रकृती स्वस्थ आहे. आमच्यावर खूप प्रेम, आशीर्वाद सारं काही दिल्यामुळे मनापासून धन्यवाद”, अशी पोस्ट धनश्रीने शेअर केली आहे.

अनुष्कानंतर करीनाने केला बेबीबंपसोबत योग; फोटो होतोय व्हायरल

दरम्यान, धनश्रीने खऱ्या अर्थाने तिचा प्रग्नंसी काळ एन्जॉय केल्याचं म्हटलं जातं. प्रग्नंसीच्या काळात धनश्रीने बरेच फोटोशूट केलं आहेत. त्यामुळे ती या काळात सातत्याने चर्चेत होती. विशेष म्हणजे धनश्रीने आई होणार असल्याची माहितीदेखील एक सुंदर व्हिडीओ शेअर करत दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 8:25 am

Web Title: marathi actress dhanashri kadgaonkar blessed with baby boy ssj 93
Next Stories
1 १० वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे बिग बींना आजही केले जाते ट्रोल
2 जेठालालच्या खऱ्या कुटुंबीयांना पाहिलेत का? पाहा फोटो
3 ‘तुझ्यासाठी तर नक्कीच बघेन’, शिल्पा शिंदेने नेहा पेंडसेला दिल्या शुभेच्छा
Just Now!
X