06 March 2021

News Flash

सिद्धार्थशी लग्न झाल्यानंतर मितालीचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरून दिली ‘ही’ माहिती

२४ जानेवारीला सिद्धार्थ-मितालीने बांधली लग्नगाठ

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर या लोकप्रिय जोडीने नवीन वर्षात लग्नगाठ बांधली. २४ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे कलाविश्वापासून ते चाहत्यांपर्यंत या लग्नाची चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच आता मितालीने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे.

उत्तम अभिनय आणि निखळ हास्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करणारी मिताली कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. बऱ्याचवेळा तिने सिद्धार्थ आणि कुटुंबासोबतचे काही फोटो शेअरदेखील केले आहेत. मात्र, यावेळी तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्येच एक बदल केला आहे.

मितालीने सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल केला आहे. मिताली मयेकर ऐवजी आता तिने मिताली मयेकर-चांदेकर असं नाव केलं आहे. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेचच मितालीने तिचं नाव बदलल्यामुळे चाहत्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.

पाहा : सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

दरम्यान, मिताली आणि सिद्धार्थ २४ जानेवारी रोजी पुण्यातील ढेपेवाडा येथे पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा झाला असून कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 2:14 pm

Web Title: marathi actress mitali mayekar adds chandekar to name instagram after wedding ssj 93
Next Stories
1 सुबोध भावेपासून बिग बींपर्यंत; सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
2 ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम अखेर झाला लॉंच, अक्षयने शेअर केला व्हिडीओ
3 ईदच्या दिवशी धडकणार ‘सत्यमेव जयते 2’चं वादळ; पोस्ट शेअर करत जॉन म्हणतो…
Just Now!
X