News Flash

नेहा पेंडसे आता अनिता भाभीच्या रुपात; ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये लवकरच होणार एण्ट्री

नव्या भूमिकेसाठी नेहा पेंडसे सज्ज

छोट्या पडद्यावरील ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. यात अनिता भाभी ही भूमिका प्रचंड गाजली. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. त्यामुळे आगामी भागापासून ही लोकप्रिय अभिनेत्री अनिता भाभीच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून अनिता भाभी या भूमिकेसाठी मालिकेची टीम नव्या चेहऱ्यांचा शोध घेत होती. अखेर या भूमिकेसाठी अभिनेत्री नेहा पेंडसे या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. नेहापूर्वी अनिता भाभी ही भूमिका अभिनेत्री सौम्या टंडन साकारत होती.

पहा : सासऱ्यांप्रमाणेच सूनबाईदेखील नृत्यात अव्वल; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘हा’ डान्स

मालिकेचे दिग्दर्शक संजय कोहली यांनी प्रथम सौम्यालाच पुन्हा विचारणा केली होती. मात्र, मालिका सोडून गेल्यानंतर पुन्हा ही भूमिका करण्यास सौम्या उत्सुक नव्हती. त्यामुळे संजय कोहली यांनी नेहा पेंडसेला विचारणा केली. विशेष म्हणजे नेहानेदेखील प्रथम ही भूमिका करण्यास नकार दिला होता. परंतु, चार महिन्यांनंतर नेहाने ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच नेहा या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे.

वाचा : दीपिकाने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सुरु झाली दीप-वीरची लव्हस्टोरी

दरम्यान, नेहा पेंडसेचा संजय कोहली यांच्यासोबत हा दुसरा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी तिने त्यांच्या ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तसंच भाभीजी घर पर हैं या मालिकेत नेहा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नेहापूर्वी ही भूमिका सौम्या टंडन करत होती. मात्र, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सौम्याने या मालिकेला रामराम ठोकला. जवळपास ५ वर्ष सौम्याने अनिता भाभी ही भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 12:18 pm

Web Title: marathi actress neha pendse finalized for bhabi ji ghar par hai serial ssj 93
Next Stories
1 टायगर-दिशाच्या रिलेशनशिपबद्दल अनिल कपूर यांनी केलं वक्तव्य, म्हणाले..
2 ‘कुछ कुछ होता है’मधील परजान दस्तूरने बांधली लग्नगाठ; पाहा फोटो
3 ‘सेक्रेड गेम्स ३’ बाबत नवाजुद्दीनचा मोठा खुलासा, म्हणाला…
Just Now!
X