News Flash

अभिनेत्री पल्लवी पाटीलचा ‘जिगरबाज’ अंदाज लवकरच

पल्लवी पहिल्यांदाच झळकणार छोट्या पडद्यावर

सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता जिगरबाज ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून अमृता पवार, पल्लवी पाटील या लोकप्रिय अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘जिगरबाज’ या मालिकेच्या माध्यमातून पल्लवी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यापूर्वी पल्लवीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, जिगरबाज ही पल्लवीची पहिलीच मालिका आहे. या मालिकेत ती डॉ. सुहानी गायकवाड ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

. .@sang_insta_gram Neckpiece @kalakaribaba . . #mirroreeflection #addictedtoblack #pallavipallavi

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil) on

दरम्यान, येत्या ११ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत पल्लवीसोबत अमृता पवार, अरुण नलावडे, प्रतीक्षा लोणकर यांसारखे दिगज्ज कलाकार झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 2:11 pm

Web Title: marathi actress pallavi patil new tv show jigarbaaz coming soon ssj 93
Next Stories
1 Ashram 2 : ‘आम्ही कायदेशीर नोटीस पाठवलीच नाही’; करणी सेनेचं स्पष्टीकरण
2 ‘द कपिल शर्मा शो’ सोडणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला…
3 ‘अर्धा तास फोनवर बोललो आणि…’; आमिर खान- किरणची हटके लव्हस्टोरी
Just Now!
X