01 October 2020

News Flash

प्राजक्ता गायकवाड ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर; विचारा तुमचे प्रश्न

प्रेक्षकांना मिळणार थेट प्रश्न विचारण्याची संधी

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. पहिल्याच मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारुन प्राजक्ताने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली. उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्राजक्ता लवकरच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर येणार आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये प्रेक्षकांनादेखील सहभागी होता येणार आहे. बुधवारी,१६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ही खुमासदार मुलाखत रंगणार आहे.

या मुलाखतीच्या निमित्ताने प्रेक्षक त्यांच्या मनातले प्रश्न थेट प्राजक्ताला विचारु शकतात. त्यामुळे या खुमासदार मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 8:13 am

Web Title: marathi actress prajakta gaikwad special interview on loksatta digital adda ssj 93
Next Stories
1 कंगना पोहोचली मनालीत; १० दिवस राहावं लागणार होम क्वारंटाइन
2 ड्रग्स प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
3 …म्हणून समंथा अक्किनेनीने सारा आणि रकुलसाठी लिहिले सॉरी
Just Now!
X