25 February 2021

News Flash

लग्नानंतर सईची नवी गूड न्यूज; ‘सनम हॉटलाइट’मध्ये साकारणार ‘ही’ भूमिका

जाणून घ्या, सईच्या वेब सीरिजविषयी

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसापूर्वीच सईने तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली असून ती तिच्या नव्या संसारात मग्न झाली आहे. मात्र, आता सईने तिचं लक्ष पुन्हा एकदा करिअरकडे केंद्रित केलं आहे. सई नुकतीच ‘सनम हॉटलाइट’ या सीरिजमध्ये झळकली असून तिची भूमिका अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘बिग बॉस मराठी’मुळे प्रकाशझोतात आलेली सई सनम हॉटलाइट या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकली असून पहिल्यांदाच ती एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आली आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता पुष्कर जोग, विनय येडेकर व उदय नेने असे लोकप्रिय कलाकारदेखील झळकले आहेत.

आकाश गुरसाले दिग्दर्शित ‘सनम हॉटलाइट’ या सीरिजची कथा तीन कॉल सेंटर एक्झिकेटिव्हच्या भोवती फिरताना दिसते. इशान (पुष्कर जोग) आणि त्याचा मित्र अभिजीत (उदय नेने) आणि शिवानी( सई लोकूर) हे तिघं एक अडल्ट हॉटलाईन चालवत असतात. मात्र, अचानकपणे एक घटना घडते ज्यामुळे हे तिघं खंडणीच्या जाळ्यात अडकतात व त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. आता नेमकं त्यांच्या आयुष्यात काय घडतं हे सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा उलगडा होणार आहे. दरम्यान, ही सीरिज मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 4:59 pm

Web Title: marathi actress sai lokur new web series sanam hotline ssj 93
Next Stories
1 ‘सनम हॉटलाइन’मध्ये झळकलेली तेजस्वी खताळ नेमकी आहे तरी कोण?
2  अजितच्या जाळ्यात अडकेल का मंजुळा? सरु आजी नेमकी कोणाची करणार मदत?
3 Then and Now… फोटो शेअर करत हेमा मालिनी यांनी धरम पाजींना दिल्या खास शुभेच्छा
Just Now!
X