News Flash

अभिनयानंतर सायली रमली डबिंगमध्ये; ‘या’ चित्रपटासाठी दिला आवाज

या चित्रपटात सायली मुख्य भूमिकेतही झळकणार आहे

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या सायलीने मराठी कलाविश्वात तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सायलीकडे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. विशेष म्हणजे आता लॉकडाउननंतर सायली पुन्हा तिच्या कामाकडे वळली असून तिने तिच्या नव्या चित्रपटासाठीचं डबिंग सुरु केलं आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या अटी आता शिथील होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील कामकाज आता पुन्हा सुरु होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचंदेखील चित्रीकरण सुरु झालं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सायलीने डबिंग केलं आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केलं असून निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. या चित्रपटात सायली संजीवसोबत सुव्रत जोशी,शशांक केतकर आणि मिलिंद गुणाजीहेदेखील झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 10:58 am

Web Title: marathi actress sayli sanjiv debuts as dubbing with gosht eka paithanichi ssj 93
Next Stories
1 बोटिंगला गेलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू; आठवड्याभरानंतर सापडला मृतदेह
2 …म्हणून विमानतळावर लिसा हेडन आणि जॅकलीनमध्ये जुंपली
3 सारा अली खानच्या कारचालकाला करोनाची लागण
Just Now!
X