आपल्या अप्रतिम सौदर्यानं आणि नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ कराणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. लवकरच सोनाली एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालीय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भाऊ अतुल कुलकर्णी याच्यासोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत एकत्र येत सोनाली कुलकर्णी ‘हाकामारी’ या सिनेमाची निर्मिती करणार आहे.
‘हाकामारी’ हा एक सस्पेन्स सिनेमा असणार आहे. सस्पेन्स सिनेमांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर? मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. ‘हाकामारी’ सिनेमा हा याच प्रकारचा आहे.
अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांना वेड लावत असते. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स,मितवा, हिरकणी,हंपीपर्यंत, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनालीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली भाऊ अतुल कुलकर्णीसोबत ‘द फॅलेरर्स’ या बॅनरच्या अंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. या नव्या भूमिकेबद्दल सांगताना सोनाली म्हणते, ” मी एक अभिनेत्री होण्याआधी एक निर्माताच होते. रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना मला निर्मिती क्षेत्राने भुरळ घातली. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटला वाव आहे. या सिनेमातून आम्ही एक वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. समीर विध्वंस सारखा दूरदृष्टी असणारा दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर ही टीम एकत्र येत एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी घेऊन येणार आहे.”
View this post on Instagram
‘हाकामारी’ हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब सिनेमा असणार आहे, या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक समीर विध्वंस करणार आहेत.लवस्टोरी सिनेमांमध्ये समीर यांचा हातखंडा आहे. तरीही या सिनेमाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
तर प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ” ‘हाकामारी’ हा अतिशय वेगळा सस्पेन्स सिनेमा असणार आहे. या सिनेमाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट या सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 8:46 am