News Flash

‘चाहूल’मध्ये स्वप्नाली पाटीलची एण्ट्री

शांभवीला प्रेमाची चाहूल लागली आहे पण ...

चाहूल

‘कलर्स मराठी’वरील ‘चाहूल’ या मालिकेला आता एक रंजक वळण मिळालं आहे. निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य शांभवी आणि सर्जाला कळता कळता राहून गेले आणि पुन्हा एकदा शांभवी निर्मलाच्या जाळ्यात अडकली. या सगळ्या घटना होत असतानाच शारदा म्हणजे सर्जाच्या आईला त्याच्या लग्नाची घाई लागली आहे, तिने सर्जासाठी मुली बघायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे निर्मला प्रंचड संतापली आहे. कारण पहिले जेनी, नंतर शांभवी आणि आता कोण ही नवीन हा प्रश्न तिला सतत त्रास देतो आहे. शारदाने सर्जासाठी माया नावाची मुलगी जानकीच्या मदतीने पसंत केली आहे. आता ही माया कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडत आहे ना? तर, मायाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री स्वप्नाली पाटील ‘चाहूल’मध्ये एण्ट्री झाली आहे. बऱ्याच दिवसांनंतर स्वप्नाली ‘कलर्स मराठी’वरील ‘चाहूल’ मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मालिकेच्या एका रंजक वळणावर तिची एण्ट्री झाल्यामुळे प्रेक्षकांसाठीही हा एक धक्काच आहे असं म्हणायला हरकत नाही. माकिलेच्या कथानकानुसार सर्जाच्या आत्याने म्हणजेच जानकीने मायाला पसंत केले आहे. पण खरंतर माया ही स्ट्रगलर आर्टिस्ट आहे ज्याची जानकीला कल्पना आहे. आता प्रश्न हा पडतोय की, जानकी आणि मायाच या सगळ्यामध्ये काय कारस्थान आहे? माया नामक मुलगी खास मुंबईहून सर्जाला भेटण्यासाठी आली आहे. कारण तिच अस मत आहे कि, ज्या मुलाशी ती लग्न करणार आहे त्याला भेटल्याशिवाय कस काय हो म्हणायचं आणि याबरोबरच त्याच्या कुटुंबांला भेटणे देखील तितकच महत्वाच आहे असे तिला वाटते. माया सर्जाला भेटते त्याच्या कुटुंबाला देखील भेटते आणि भोसले वाड्यात रहायला देखील लागते. पण हळूहळू शांभवीला मात्र कुठेतरी त्यांच्यातील मैत्री खटकू लागते. शांभवीला अस का होत आहे हे तिला नेमक काही कळत नाही. शांभवीला प्रेमाची चाहूल लागली आहे पण याची जाणीव तिला कधी होईल? हे पाहणे रंजक ठरेल.

वाचा: Cannes 2017: पुन्हा एकदा वर्णभेद? सोनमच्या जागी दीपिकाचं नाव

जानकी आणि मायाच काय कारस्थान आहे? हे कारस्थान निर्मला किंवा शांभवी पर्यंत पोहचेल का? सर्जाच्या मनामध्ये नक्की काय आहे? निर्मला आता माया आणि सर्जाला दूर करण्यासाठी काय करेल? शांभवीला सर्जाबद्दल प्रेम वाटू लागले आहे का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘चाहूल’मधून मिळतीलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 7:03 pm

Web Title: marathi actress swapnali patil to join colors marathi serial chaahul
Next Stories
1 अमेय, सखी, सुव्रतच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ची शंभरी
2 Kaala Karikaalan first look: ‘काला’चा फर्स्ट लूक पाहून तुम्हीही म्हणाल, माइंड इट!
3 VIDEO : प्री वेडिंगवरही राणादा अन् अंजली बाईंचीच जादू
Just Now!
X