आजच्या तरुणपिढीचं भावविश्व मांडणारा मराठी चित्रपट ‘ड्राय डे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ड्राय डे’ या नावामुळेच अधिक चर्चा होत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आली. गतवर्षी १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होऊ न शकलेल्या ‘ड्राय डे’ चित्रपटाला, सेन्सॉरच्या नियमावलीमुळे प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, अखेरीस ही प्रतीक्षा आता संपली आहे. संजय पाटील यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाचा पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आला. आजच्या तरुणपिढीचे भावविश्व मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार हे निश्चित. संगीतदिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातील ‘अशी कशी’ आणि ‘गोरी गोरी पान’ या सुपरहीट गाण्यांनी रसिकांची मने यापूर्वीच जिंकली असल्यामुळे, ‘ड्राय डे’ची उत्सुकता सिनेप्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.
Photo: सोनम- आनंदच्या लग्नाला यायचं हं! ई-वेडिंग कार्डने पाहुण्यांना आमंत्रण
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या आगळ्यावेगळ्या ‘ड्राय डे’चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, मोनालिसा बागल, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 6:35 pm