काही मोजके चित्रपट असे असतात जे प्रदर्शननंतर बराच काळ उलटून गेल्यावरही प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालतात. मराठी कलाविश्वात अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातले काही चित्रपट सांगायचे झाले तर, ‘बनवाबनवी’, ‘श्वास’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सैराट’ किंवा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘धुरळा’. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या धुरळा या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर दिसून येत आहे. त्यामुळेच हा चित्रपट लवकरच झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे.

सध्या नवरात्रीचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर धुरळा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता या चित्रपटाचा World Tv Premier होणार आहे.

दरम्यान, या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अमेय वाघ आणि अलका कुबल ही कलाकार मंडळी झळकली आहेत. सत्तेसाठी घरात सुरु झालेला वाद यावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.