04 March 2021

News Flash

Video : लवकरच प्रदर्शित होणार ‘डोक्याला शॉट’

चार मित्रांची धम्माल कथा या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

अभिनेता सुव्रत जोशी याची प्रमुख भूमिका असलेला ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. अभिनेता रितेश देशमुख याच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संगीतकार कैलाश खेरही उपस्थित होते. चार मित्रांची धमाल गोष्ट सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘डोक्याला शॉट’ या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथादेखील अगदी हटके आहे. ही कथा चार मित्रांच्या आयुष्यात घडते. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळाणार आहे. हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण असे एक ‘पॅकेज’ असणार आहे.

अभिजीत (सुव्रत जोशी) आणि सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) हे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांचे लग्न ज्या दिवशी होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच एक घटना घडते, आणि त्यातून संपूर्ण चित्रपटाला कलाटणी मिळते. अभिजीत आणि त्याचे मित्र यांची या घटनेतून जी काही तारांबळ उडते आणि त्यातून सावरताना जी धमाल होते ती म्हणजे ‘डोक्याला शॉट’. एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे या चित्रपटाद्वारे त्यांचे अभिनयाचे कौशल्य दाखवणार आहे.

‘हा चित्रपट खळखळून हसविणारा असून ट्रेलर पाहताना मी प्रचंड हसलो आहे. विशेष म्हणजे हसता हसता मी केवळ खुर्चीतून खाली पडायचो बाकी होतो. चित्रपटाचं कथानक सुंदर चित्रपट असून मैत्रीवर आधारित आहे. आपण आयुष्यात एकच गोष्ट खरी कमावतो आणि ती म्हणजे ‘मैत्री’. आपली खरी मैत्री आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. त्यामुळे अशा या वेगळ्या तरीही जिव्हाळ्याच्या विषयावर असलेला हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. मी शाश्वती देतो, की तुमची चित्रपटगृहातून बाहेर पडताना नक्कीच निराशा होणार नाही.’असं रितेश म्हणाला.

कैलास खेर हे देखील या सोहळयाला आवर्जून हजर होते. कैलाशजींनी या चित्रपटात एक गाणे देखील गायले आहे. ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. उत्तुंग ठाकूर यांनी या आधी ‘बालक पालक’, ‘येल्लो’ यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला एक उत्तम दिग्दर्शक लाभणार आहे. ‘न्यूड’, ‘बालक पालक’, ‘रेगे’, ‘येल्लो’ अशा विविध विषयांवर आधारित अप्रतिम चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शिवकुमार पार्थसारथी हे ‘डोक्याला शॉट’ चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. याशिवाय गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 3:36 pm

Web Title: marathi movie dokyala shot
Next Stories
1 अखेर प्रियांकानेच उलगडलं त्या फोटोग्राफर्सचं गुपित
2 रितेशने शोधला अजयचा कुत्रा….नेटीझन्सनी केली ‘टोटल धमाल’
3 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मध्ये होणार केतकी चितळेची एण्ट्री
Just Now!
X