18 January 2021

News Flash

Video : स्वप्नांच्या रेशीम धाग्याने विणलेली ‘गोष्ट एका पैठणीची’; टीझर प्रदर्शित

पैठणी हा प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो

आयुष्य जगत असताना प्रत्येक जण काही ना काही स्वप्न उराशी बाळगून असतात. यात काही स्वप्न ही साधी सोपी असतात, तर काही स्वप्नं ही कठीण परीक्षा घेणारे असतात. त्यामुळे काहींची स्वप्न सहज पूर्ण होतात. तर काहींना मात्र प्रचंड कष्ट करावे लागतात, यात अनेकांची ही स्वप्न ही अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा.. अशाच एका तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

पैठणी हा प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. त्यामुळे आपल्याकडे एकतरी पैठणी असावी असं प्रत्येकीला वाटतं. असंच एक स्वप्न, इच्छा या चित्रपटातील अभिनेत्रीची आहे. त्यामुळे प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ती तिची लहानशी स्वप्न व्यक्त करताना दिसून येत आहे.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत असून शंतनू गणेश रोडे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं कथालेखनही त्यांनीच केलं आहे. तर अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे निर्मिती करणार आहेत. दरम्यान,चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार झळकणार असून अद्यापही काही नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:53 pm

Web Title: marathi movie goshta eka paithanichi teaser out ssj 93
Next Stories
1 जेव्हा १५ वर्षांच्या मुलाने सुष्मितासोबत केले होते गैरवर्तन
2 श्रृतीने वडिल कमल हासनबाबत केला खुलासा, म्हणाली…
3 वयाच्या ५० व्या वर्षीही ‘ही’ अभिनेत्री भल्याभल्या अभिनेत्रींना देते टक्कर
Just Now!
X