News Flash

रिंकूला हवाय राजकुमार?

रिंकूला तिचा राजकुमार मिळणार का?

‘सैराट’ या चित्रपटातून नावारुपाला आलेल्या रिंकू राजगुरूचा ‘मेकअप’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर स्क्रीन शेअर करणार असून या दोघांची भन्नाट केमिस्ट्री रंगताना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या चित्रपटात रिंकू पूर्वी हे पात्र साकारत असून चिन्मय डॉक्टरचा रुपात दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण असा प्रश्न निर्माण होतो. ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा ‘हॉट’ राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल.


या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. गणेश पंडित यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले असून या चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे. भन्नाट विषय हाताळण्यात त्याचा हातखंडा असल्याने ‘मेकअप’मध्येही असेच काहीतरी हटके पाहायला मिळणार, हे नक्की

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:03 pm

Web Title: marathi movie makeup official trailer out rinku rajguru chinmay udgirkar ssj 93
Next Stories
1 Review : काळजाचा थरकाप उडवणाऱ्या ‘Ghost Stories’
2 WWE मध्ये लगीनघाई पडली महागात; अक्षतांऐवजी पडले बुक्के
3 ‘हा’ अभिनेता साकारणार ‘शहीद भाई कोतवाल’ यांची भूमिका
Just Now!
X