बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच आता मराठी कलाकारही दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांमध्ये पदार्पण करत आहेत. यामध्येच लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘मन फकिरा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयी दिग्दर्शनाच्या क्षेत्राच पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे मृण्मयीने या चित्रपटाचं केवळ दिग्दर्शनचं केलं नसून चित्रपटाची कथादेखील लिहीली आहे. मात्र या कथेमागे एक रंजक किस्सा आहे. तो मृण्मयीने लोकसत्ताच्या डिजिटल अड्डामध्ये सांगितला.

एखाद्या विषयावर काही लिहावंसं वाटलं तर बहुदा अनेक जण शांततेच्या ठिकाणी जाऊन विचार करतात मग एखाद्या विषयावर लिहायला सुरुवात करतात. मात्र मृण्मयीच्या बाबतीत काही वेगळंच घडलं आहे. ‘मन फकिरा’ या चित्रपटाची कथा तिला चक्क ट्रॅफिकमध्ये सुचली.


दरम्यान, हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सुव्रत आणि सायलीसोबत अंजली पाटील आणि अंकित मोहन हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे.