News Flash

प्रेमाची अनोखी सफर घडवणारा ‘प्रीतम’ लवकरच

प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकरचा नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

फेब्रुवारी महिना जवळ येऊ लागला की तरुणाईला वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाइन डे’चे. या दिवशी प्रत्येक जण त्यांच्या मनातील भावना आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. त्यातच महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह काही सांगायलाच नको. १४ फेब्रुवारीपूर्वीच त्यांचे विविध डे सुरु होतात. मग कधी चॉकलेट डे तर, कधी रोझ डे. विशेष म्हणजे याच प्रेमाची व्याख्या उलगडणारा प्रीतम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भावनांच्या हिंदोळ्यावर प्रेमाची अनोखी सफर घडविण्यासाठी ‘प्रीतम’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

सिजो रॉकी दिग्दर्शित प्रीतम हा चित्रपट येत्या १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आबा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर ही कलाकार मंडळीदेखील दिसणार आहेत.

दरम्यान, गुरु ठाकूर लिखित या चित्रपटातील गीतांना शंकर महादेवन यांचा स्वरसाज लाभला आहे. तर चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण कोकणात पार पडल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 5:04 pm

Web Title: marathi movie preetam coming soon pranav ravrane and nakshatra medhekar ssj 93
Next Stories
1 कंगना रणौतवर लेखकाने केला चोरीचा आरोप; पाठवली कायदेशीर नोटीस
2 लसीकरणाला सुरुवात; प्रियांकानं दिल्या करोना योद्ध्यांना शुभेच्छा
3 Video : ‘इन द मॉर्निंग’ म्हणत जेनिफर लोपेझने केलं न्यूड व्हिडीओशूट
Just Now!
X