नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. ते चेहरे म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर. या दोन्ही नवोदित कलाकारांनी साकारलेल्या ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत, इतकत नव्हे तर परदेशातही या कालाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटानंतर रिंकूने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं, तर आकाशने कलाविश्वातच करिअर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

आकाशच्या लोकप्रियतेतही दर दिवसागणिक वाढ होत गेली. मुख्य म्हणजे तुलनेने त्याच्या चाहत्यांमध्ये फिमेल फॅन फॉलोअर्सचा आकडा जास्त असल्याचं लगेचच लक्षात येत आहे. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या आकाशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तो जिममध्ये ट्रेनिंग घेताना दिसत आहे. त्याच्या एकंदर शरीरयष्टीत बदल झाला असून, ‘सैराट’चा परश्या आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार अंदाजात सर्वांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

आकाश काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरी’ज या वेब सीरिजमधील एका भागात झळकला होता. ज्यामध्ये त्याने राधिका आपटेसोबत स्क्रीन शेअर केली होती. आकाशच्या करिअरच्या दृष्टीने पाहता ही त्याच्या वाट्याला आलेली एक सुवर्णसंधीच होती. आपल्या वाट्याला येणारं प्रत्येक स्वप्व पूर्ण करत टप्प्याटप्प्याने यशशिखराच्या दिशेने वाटचाल करणारा हा अभिनेता आता येत्या काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.