News Flash

ओटीटीवर गाजत असलेले ‘हे’ मराठी चित्रपट पाहिलेत का?

जाणून घ्या, या चित्रपटांविषयी

सध्याचा काळ हा ओटीटीचा आहे. त्यामुळे अनेक चित्रपट, वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळतं. करोना काळात तर अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी दिग्दर्शक, निर्मात्यांनी ओटीटीलाच पसंती दिली. यात अमेझॉन, नेटफ्लिक्स, एमएक्स प्लेअर हे काही ओटीटी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. बऱ्याचदा ओटीटी म्हटलं की त्यात हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांनाच अधिक पसंती मिळते असा एक सर्वसामान्य समज आहे. परंतु, सध्या अॅमेझॉन या ओटीटीवर काही मराठी चित्रपट गाजताना दिसत आहेत. त्यामुळे हे मराठी चित्रपट कोणते ते पाहुयात.

दुनियादारी –

७०च्‍या दशकातील कथा सांगणारा हा चित्रपट संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातून मैत्री आणि प्रेम या दोघांवर उत्तमरित्या भाष्य करण्यात आलं आहे. हा चित्रपट लेखक सुहास शिरवळकर यांच्‍या दुनियादारी या कादंबरीवर आधारित आहे. हा दशकातील (२०१०-२०२०) एकमेव भारतीय चित्रपट आहे, ज्‍याने सिनेमागृहांमध्‍ये ४० आठवडे पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर गाजणारा हा चित्रपट ओटीटीवरही तितकाच गाजत आहे.

नटसम्राट –

अद्वितीय लेखन व लक्षवेधक अभिनय असलेला हा अत्‍यंत वास्‍तविक चित्रपट पाहण्यासारखा आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, मेधा मांजरेकर आणि विक्रम गोखले ही दिग्गज कलाकार मंडळी झळकली आहेत. या चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला असून नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे.

भातुकली –

चित्रपटाला अत्‍यंत खास बनवणारी बाब म्‍हणजे चित्रपटाचे कथानक. हा अभूतपूर्वरित्‍या वर्तणूकीसंदर्भातील मानसिकतेला सादर करणारी साधी कथा असलेला मराठी चित्रपट आहे. प्रेम, हृदयभंग व आंबट-गोड नात्‍यांची हृदयस्‍पर्शी कथा ‘भातुकली’ हा श्रीकांत देशमुख व त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांवर आधारित चित्रपट आहे.

हिरकणी –

हा भुकेलेल्‍या तान्‍ह्या मुलापर्यंत पोहोचण्‍याचा धाडसी प्रयत्‍न करणा-या आईची वास्‍तविक कथा या चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट प्रत्‍येक सूक्ष्‍म भावनांना सुरेखरित्‍या सादर करतो. ही गवळण हिराची कथा आहे, जी रायगडाच्‍या पायथ्‍याशी राहते आणि दूध विकण्‍यासाठी दररोज गडावर जाते. शिवाजी महाराजांनी दिलेल्‍या आदेशानुसार सायंकाळनंतर गडाचे दरवाजे बंद झाल्‍यावर सकाळशिवाय उघडू शकत नाहीत. एके दिवशी हिराला उशीर होतो आणि तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झालेले असतात. ती तिच्‍या तान्‍ह्या मुलापर्यंत पोहोचण्‍यासाठी काळोख्‍या रात्रीमध्‍ये उंच कड्यावरून खाली उतरण्‍याचे धाडस करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 3:07 pm

Web Title: marathi movies on ott platform ssj 93
Next Stories
1 निलेश साबळेच्या कार्यक्रमात ओम-स्वीटूची हवा; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगला विशेष भाग
2 सारा अली खानचा बहिणीसोबतचा फोटो पाहिलात का?
3 ऐन लग्नात अंकुशराव पाटलांची एण्ट्री; निर्विघ्नपणे पार पडेल का प्रियांका-राजवीरचं लग्न?
Just Now!
X