मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. सा-या रसिकांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी चित्रपटातच नाहीतर नाटक आणि हिंदी चित्रपटातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.

प्रश्न : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले नाटक कोणते?
पर्याय-
१. अबब विठोबा बोलू लागला
२. उचलबांगडी
३. टूर टूर

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत जवळपास दोन दशकं अक्षरश: धुमाकूळ घातला. विनोदाचे अत्यंत अचूक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावर अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणा-या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले. लक्ष्मीकांत यांनी १९८५ मध्ये ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’ , ‘थरथराट’ यांसारखे अनेक दमदार चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे लक्ष्मीकांत यांचे ट्युनिंग कमालीचे होते. सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी १९८९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले ‘साजन’ , ‘बेटा’ आणि ‘हम आपके है कौन’ हे हिंदी चित्रपट खूप गाजले. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांना हिंदीत क्वचितच मिळाली.

लक्ष्मीकांत यांची ‘शांतेचे कार्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे द्वार’,  ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘लेले वि. लेले’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘उचलबांगडी’ ही नाटकेही यशस्वी ठरली. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एक होता विदुषक’ या गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.

रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी छाप पाडणा-या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ रोजी या जगाचा निरोप घेतला. पण, लक्ष्मीकांत बेर्डे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून नेहमीच आपल्यात जीवंत राहतील.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर-
सिने’नॉलेज’ : अदिती राव हैदरीने कोणत्या मराठी चित्रपटात काम केले होते?
उत्तर- रमा माधव