बाळूमामाच्या नावानं चांगभल या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांच्या जीवनकार्याचा प्रवास उलगडला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेमध्ये अनेक घटना प्रेक्षकांच्या भेटीला आल्या असून आता पुढील भागामध्ये विठ्ठल -बीरदेव हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

बाळूविषयी सतत काही ना काही तक्रारी येत असतात.त्यामुळेच त्याची आई त्याला घरातून बाहेर न पडण्याचं सांगते. इतकंच नाही तर घराबाहेर पडू नये यासाठी ती बाळूकडून वचनदेखील घेते. दरम्यान, याचवेळी गावावर अनेक संकटं येतात. परंतु आईच्या बंधनात अडकल्यामुळे बाळू गावकऱ्यांची मदत करु शकत नाही.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

या काळामध्ये गावातील पंच गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं खापर बाळूवर फोडतो. यादरम्यान, देव्प्पा नवं कारस्थान रचतो. त्याच्या कारस्थानामुळे मयप्पाच्या वागण्यातही बदल होतो. त्यातच गावकऱ्यांना भरावा लागणारा कर. त्यामुळे गावकऱ्यांची चौहुबाजूने कोंडी झाली आहे. परंतु बाळू मदत करु शकत नाही. यासाठीच विठ्ठल आणि बीरदेवी बाळूच्या मदतीला धावल्याचं दिसून येत आहे.

आता विठ्ठल बीरदेव यांच्या मदतीने बाळू संकटावर कशी मात करणार हे बघायचं असेल तर सोमवार ते शनिवार संध्या. ७३०. वाजता ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका नक्की बघा.