13 December 2017

News Flash

प्रचाराच्या रिंगणात आता कलाकारही

शिवसेनेच्या प्रचारादरम्यान सुरभीने जाहीर सभेत भाषण केले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 19, 2017 7:36 AM

राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची सध्या सर्वत्र धामधूम सुरु आहे. सर्व पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारात कोणतीही कमतरचा राहू नये याची योग्य ती देखरेख घेतली जात आहे. यासाठी अनेकजण प्रचारासाठी हटके पद्धत अवलंबण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण यावेळी जालन्यातील एका शिवसेनेच्या उमेदवाराने मराठी कलाकारांनाच आमंत्रण दिलं आहे. घनसावंगी तालुका येथील तीर्थपुरी गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार महेंद्र पवार यांच्या प्रचारात ‘जय मल्हार’ मालिकेतील ‘म्हाळसा’ फेम अर्थात अभिनेत्री सुरभी हांडे हिने हजेरी लावली होती.

शिवसेनेच्या प्रचारादरम्यान सुरभीने जाहीर सभेत भाषण केले. या सभेत भाषण देत असताना सुरभीने उपस्थित मतदारांना ‘जय म्हल्हार’ मालिकेतील कथानक ऐकवून मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी तीर्थपुरीमध्ये सुरभीला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यातल्या जिल्हा परिषदाच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा प्रचार आता शांत झाला आहे. पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जालन्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी कुठे रॅली तर कुठे मतदारांना प्रत्यक्ष भेटून आपआपल्यापरिने प्रचार केला.

First Published on February 15, 2017 5:32 pm

Web Title: marathi serial jai malhar actress surabhi hande in jalna for campaigning shivsena candidate