News Flash

‘कारभारी लयभारी’! निखिल चव्हाणची नवी मालिका लवकरच

राजकारणाची जोड असणारी प्रेमकहाणी

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निखिल चव्हाण. उत्तम अभिनयशैली आणि स्मार्टनेस यांच्या जोरावर निखिल आज प्रचंड लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे कमी कालावधीत निखिल आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. पहिल्याच मालिकेत लष्करातील जवानाची भूमिका साकारणारा निखिल आता, एका राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ‘कारभारी लयभारी’ या मालिकेची चर्चा सुरु आहे. ही मालिका राजकारणावर आधारित असून यात मुख्य भूमिकेत कोणता कलाकार झळकणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दाटली होती. मात्र, अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून हळूहळू प्रत्येक प्रश्नावरुन पडदा दूर होत असल्याचं दिसून येत आहे. ‘कारभारी लयभारी’ या मालिकेमध्ये अभिनेता निखिल चव्हाण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या मालिकेचं दिग्दर्शन इंद्रजीत भोसले यांनी केलं आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये निखिल पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचं दिसून येत आहे. त्याची बोलण्याची पद्धत, पेहराव आणि भाषण करण्याची स्टाइल अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तसंच या मालिकेत राजकारणाची जोड असणारी प्रेमकहाणी पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे.दरम्यान, या मालिकेविषयी अद्याप अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत. मात्र, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 2:59 pm

Web Title: marathi serial karbhari laybhari promo main lead characters nikhil chavvan ssj 93
Next Stories
1 वर्धा : करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास ५० लाखांचा धनादेश
2 Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं
3 ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ
Just Now!
X