News Flash

दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी परत येणार; ‘अग्गबाई सासूबाई’मध्ये पुन्हा एकदा आजोबांचा दरारा

ज्येष्ठ अभिनेता साकारणार आजोबांची भूमिका

छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे अग्गबाई सासूबाई. सध्या ही मालिका चांगल्याच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सोहमचं गर्वहरण होऊन आता त्याला आईची किंमत कळू लागली आहे. त्यामुळे आसावरी आणि सोहम यांच्या नात्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी म्हणजेच आजोबा पुन्हा एकदा घरी परतणार आहे.

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन हे आजोबांची भूमिका साकारत होते. त्यांच्या दमदार अभिनयशैलीमुळे त्यांनी ही भूमिका खऱ्या अर्थाने जागवली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच रवी पटवर्धन यांचं निधन झालं. त्यामुळे आता त्यांची भूमिका नेमकी कोणता अभिनेता साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, लवकरच आजोबांच्या भूमिकेत एक नवा अभिनेता झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, हे आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत. येत्या ४ जानेवारी रोजी होणाऱ्या भागात मोहन जोशी आजोबांच्या भूमिकेतून या मालिकेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना “सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर” हा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 4:08 pm

Web Title: marathi tv show aggabai sasubai ajjoba is back ssj 93
Next Stories
1 रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ; बिग बींसोबत काम करण्यासाठी घेणार इतके कोटी
2 …म्हणून दीपिकाने डिलीट केल्या सोशल मीडियावरील पोस्ट
3 Video : याची देही,याची डोळा… ; पाहा सई लोकूरचा लग्नसोहळा
Just Now!
X